Pages

Tuesday, April 19, 2016

अंधळा आणि बुद्ध

एक अंधळा गावातील लोकांना सतत म्हणे, मला प्रकाश दाखवा. त्याचा स्पर्श घडवा, मला त्याची चव चाखायची आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीला त्या अंध्ल्याचे समाधान करता येईना. सारेजण वैतागले होते त्याच्या या मागणीला कोण तयार होत नव्हते. त्या गावात एकदा भगवान बुद्ध आले. त्या आंधळ्याची हकीकत ऐकून बुद्ध म्हणाले, उपदेशाची नाही तर उपचारांची गरज आहे. वैद्यांकडे न्या. त्याप्रमाणे आंधळ्याला वैद्यांकडे नेण्यात आले. त्याचा डोळ्यातील मोतीबिंदू काढण्यात आला. तो माणूस आनंदाने नाचत बुद्धांजवळ गेला. बुद्ध म्हणाले, आता मला प्रकाशाची चव, स्पर्श, ध्वनी हे सारे तू दाखव. तो माणूस म्हणाला, हे कसं शक्य आहे? हे सारे आता मी जाणतो. पण दाखवू शकत नाही. बुद्ध म्हणाले, वेड्या माणसा, सारे लोक तुला हेच सांगत होते पण तू ऐकत नव्हतास. तो माणूस म्हणाला, म्हणूनच माझ्या डोळ्यावर उपचार झाले. त्याचं ऐकून गप्प राहिलो असतो तर अद्याप आंधळाच राहिलो असतो.


तात्पर्य: सत्य मानले जाऊ शकत नाही. ते जाणावे लागते. अनुभवावे लागते.

दिनविशेष - १९ एप्रिल

१७७५: अमेरिकन राज्य्क्रांतीला सुरुवात.

१८२४: ब्रिटीश कवी लॉर्ड बायरनचे निधन.

१८८२: शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनचे निधन.

१८९७: बोस्टन मॅरेथोनला सुरुवात.

१९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांना फाशी.

१९५७: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.

२००५: जर्मनीचे कार्डिनल जोसेफ रॅटझिंगर पोप बेनेडिक्ट १६वे बनले.


२०११: क्युबाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल कमिटीतून फिडेल कॅस्ट्रो यांचा राजीनामा.

Sunday, April 17, 2016

दिनविशेष - १७ एप्रिल

१४७९: कवी सुरदास यांचा जन्म.

१७७४: वाफेवर चालणारे मुद्रणयंत्र शोधणाऱ्या फ्रेडिश कोनिम यांचा जन्म.

१७९०: श्रीरंगपट्टणला इंग्रजांचा वेढा, टिपू सुलतान आणि इंग्रजांमध्ये शेवटचे युध्द.

१८९१: श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म.


१९२७: माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा जन्म.

देवमाशाचा प्रश्न

एक देवमासा सागराचे नाव ऐकत ऐकतच लहानाचा मोठा झाला. वृद्ध झाला. एवढा काळ सागराचे नाव ऐकूनच तो थकला होता. त्याने आपल्या राजाला विचारले, मी नेहमी सागराचे फक्त नाव ऐकत आलोय. पण हा सागर म्हणजे तरी काय? तो कोठे असतो? काय करतो? तेव्हा त्या राजाने त्याला सांगतले. अरे वेड्या तुझा जन्म सागरातच झाला. तू सागरातच वाढलास. तुझे सारे जग आणि सारे जीवन म्हणजे सागरच आहे. सागर हेच तुझे विश्व. यावर तुझीच सत्ता आहे. तुझ्या आत बाहेर सागरच आहे. आणि तुझा शेवटही सागरातच आहे. या सागराने प्रतिक्षणी तुला घेरलेले आहे. फक्त डोळे उघडे ठेवून जाणीवेने पहायला शिक. यशाचेही असेच आहे. तुझं आहे तुझ्यापाशी असे म्हटले जाते. यश मिळण्याची ताकद आपल्यामध्येच असते. तिला कुणीतरी जागृत करावे लागते. कुणीतरी प्रोत्साहन द्यावे लागते. कुणीतरी आव्हान देऊन आतील गुणांना बाहेर येऊ द्यावे लागते. आपल्याला माहीतच नसते की, यशाचे रहस्य आपल्या आत्मविश्वास, आकलनशक्ती, मनन आणि चिंतनातच आहे. फक्त त्याचा डोळस वृत्तीने शोध घ्यावा लागतो.


तात्पर्य: यशाचा शोध घेण्यासाठी आधी स्वतःलाच ओळखा.

Saturday, April 16, 2016

जगात निरुपयोगी काहीही नाही

प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य, आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपण सांगावे.'

'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!'

मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो.

Friday, April 15, 2016

कोल्हा आणि म्हातारी

एका गावात एक श्रीमंत आजीबाई रहायच्या. त्यांचा गावात मोठा वाडा होता. गावाच्या बाहेर एक मोठे जंगल होते. तेथील एक कोल्हा रोज त्यांचा कोंबड्यांना चोरून न्यायचा. एक दिवस आजीबाईंनी त्याचा मागे जंगली कुत्री सोडली. कोल्हा आपले प्राण वाचवून पाळला. एक दिवस आजीबाईंची नात तिच्या मैत्रिणींसोबत गावात फिरण्यासाठी आली. आजीबाई आपल्या नातीला व तिच्या मैत्रिणींना घेऊन जंगलात फिरण्यासाठी गेल्या. तेथे त्यांनी घरून नेलेल्या कोंबड्या मारल्या आणि वनभोजन करण्यासाठी बसल्या. त्याचवेळी तो कोल्हा पक्ष्यांची शिकार करून जंगलातून जात होता. त्याने मुलीना वनभोजन करताना पहिले. तो त्यांना म्हणाला, मुलींनो या कोंबड्या तुम्हीच मारून खात आहात म्हणून ठीक, नाहीतर माझ्यासारख्या एखाद्या गरीब कोल्ह्याने जर या कोंबड्या मारून खाल्या असत्या तर तुम्ही त्याचा मागे शिकारी कुत्री लावून त्याला पकडून त्याचा जीव घेतला असता. हे ऐकून आजीबाई त्याला म्हणाल्या, अरे मुर्खा आम्ही आमच्या स्वतःच्या कोंबड्या मारून खातो आणि तू लोकांच्या कोंबड्या मारून खातोस, हा फरक जर तुज्या लक्षात आला असतं तर तू हे बोललाच नसतास!


तात्पर्य: दुसऱ्याची वस्तू चोरून तिची वाटेल ती व्यवस्था करण्याचा अधिकार कोणालाही नाही. 

दिनविशेष - १६ एप्रिल

१८५३: भारतीय रेल्वेची सुरुवात.

१८६७: विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूपैकी विल्बर राईट यांचा जन्म.

१८८९: अभिनेता चार्ली चॅप्लिन यांचा जन्म.

१९१८: अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म.

१९३४: भारतीय जनता पक्षाचे नेते राम नाईक यांचा जन्म.


१९४७: अर्थतज्ञ बर्नार्ड बुरुच यांनी दक्षिण कॅरोलीनात केलेल्या भाषणात कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध या 
शब्दाचा सर्वप्रथम वापर केला.